आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोर बंजारा धर्मजागरण:गोर धर्म व गोर धाटी संस्कृती जुनी अन् जगात सर्वश्रेष्ठ ; महंत जितेंद्र महाराजांचे प्रतिपादन

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील बंजारा समाजाच्या पूर्वजांनी स्थापन केलेला गोर धर्म आणि गोर धाटी-संस्कृती सर्वात जुनी आणि जगात सर्वश्रेष्ठ आहे. ही संस्कृती व बंजारा मर्मस्थळे अबाधित व मजबूत ठेवण्यासाठी व बंजारा समाजाची धार्मिक ओळख पुसून जाणार नाही यासाठी साधू-संतांनी प्रयत्न करावेत, असे महंत जितेंद्र महाराज यांनी आवाहन केले.

गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे देशातील बंजारा समाजाचे नेते किसनभाऊ राठोड यांच्या भरीव आर्थिक सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या मराठवाड्यातील बंजारा समाजाची पवित्र काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंजारा तीर्थक्षेत्र “सेवाधाम’ येथे गोर बंजारा धर्म जागरण कार्यक्रम उत्साहात झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

सर्वप्रथम संत सेवालाल महाराज व मरयामा देवीची पूजा आरदास (भोग) करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर उपस्थित असलेले भक्तिधाम पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, गोर धर्माचे राष्ट्रीय प्रवक्ते साहेबराव शास्त्री महाराज, महंत सुंदरसिंग महाराज, महंत अनिल महाराज, महंत जेमा महाराज, बाजीराव महाराज यांचा राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व बंजारा तिर्थक्षेत्र सेवाधाम संस्थानचे अध्यक्ष प्रा.पी.टी.चव्हाण यांनी उपस्थित पाहुणे, संत-महंत व कार्यकर्त्यांचे स्वागत करून सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास समाजबांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, बंजारा समाजातील मान्यवरांनी समाजाच्या विकासासाठीच्या मुद्यांवर आपल्या भाषणातून विचार मांडले.

गोर बंजारा बांधवांनी आता एकजुटीने लढा द्यावा
गोर बंजारा समाजावर सामाजिक, राजकीय व न्याय व्यवस्थेकडून वारंवार अन्याय, अत्याचार होत आहेत. बंजारा तांडे विकासापासून कोसो दूर आहेत. या अन्यायाच्या विरोधात आवाज बुलंद करून सरकारच्या उदासीन धोरणांवर हल्लाबोल करणे गरजेचे आहे. संघटित होऊन गोर बंजारा बांधव व प्रबोधनकारांनी एकजुटीने लढा देणे काळाची गरज आहे, असे मत प्रा. पी. टी. चव्हाण यांनी व्यक्त केले. उद्योगपती किसनभाऊ राठोड यांनी निर्माण केलेल्या पोहरादेवी येथील गोर बंजारा धर्मपीठ भक्तिधाम संस्थानकडून देशातील बंजारा साधू-संत महंतांचा सदैव यथोचित सन्मान केला जातो. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात, असे विचार मांडले.

बातम्या आणखी आहेत...