आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी:गुणपत्रकावर खाडाखोड करत मिळवली नोकरी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परिक्षेत नापास असतानाही गुणपत्रिकेत खाडाखोड करुन पास असल्याचे सांगून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती प्रक्रियेत सहभागी होत वाहन चालकाची नोकरी मिळवल्याचा प्रकार चार वर्षानंतर समोर आला. या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहराजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१८ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती. यामध्ये, शेख रिजवान शेख गफ्फार याने वाहन चालक पदासाठी अर्ज केला होता.

किमान दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रतेची अट होती. मात्र, रिजवान हा दहावी नापास होता. त्याने भरती प्रक्रियेत सहभागी हाेण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड करुन दहावी पास असल्याचे दाखवून वाहनचालक पदासाठी अर्ज केला त्याची वाहन चालक म्हणून निवडही झाली. मात्र, त्यानंतर काही दिवसांची याबाबत तक्रार केली गेली. यानंतर चौकशी करण्यात आली. यात, रिजवान याचे गुणपत्रक चूकीचे असल्याचे व तो नापास असतानाही त्याने पास म्हणून दाखवत फसवणूक केल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...