आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन हवे:शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती लाभ त्वरित मिळण्यासाठी नियोजन हवे

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच महाराष्ट्र प्रशासनीय न्यायाधीकरण, मुंबई यांनी दिपक माहेकर, रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर विरुध्द महाराष्ट्र शासन या प्रकरणात निर्णय देतांना महाराष्ट्र शासन, पोलीस महानिरीक्षक व पोलीस कमिशनर मुंबई यांना सर्व्हिस बुक तपासणीमुळे पेन्शन व ग्रॅच्युटी देण्यामध्ये विलंब करू नये, अशी सूचना केली. शासकीय कार्यालयांनी पुर्व नियोजन करावे की, निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभापासून शासकीय कर्मचारी किंवा कर्मचारी वंचित राहता कामा नये. त्याचप्रमाणे पेन्शन रूल्स १९८२ रुल १२९ अ प्रमाणे जर निवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅच्युटी मिळण्यामध्ये विलंब होत असेल तर त्यासाठी निवृत्तीदार हा व्याज मिळण्यासाठी पात्र राहिल. निवृत्तीवेतन वेळेवर भेटत नसेल ते प्रशासकीय कमतरता दर्शवितो व त्यामुळे प्रकरणात शासन, पोलीस महानिरीक्षक व पोलीस कमिशनर यांना व्याजासह एका महिन्याच्या आत ग्रॅच्युटी, लिव्ह इनकॅशमेंट देण्याचे आदेश न्यायाधिश ओ. पी. कुरेकर दिला. हा निर्णय दिशा देणारा असल्याचे अॅड.महेश धन्नावत यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...