आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्र; शासकीय संमिश्र केंद्रात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत

अंबाजोगाई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्राला नाविन्यपूर्ण बदलांकडे घेऊन जाण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. तसेच संमिश्र दिव्यांग केंद्रात चालू शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आवाहन करण्यात आले आहे.

अंध,मूकबधिर व अस्थिव्यंग या तिन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देणारे संमिश्र स्वरूपातील मराठवाड्यातील ही एकमेव शासकीय संस्था आहे . अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीपाठोपाठ १९७५ मध्ये शासकीय संमिश्र दिव्यांग केंद्र आलेले आहे. अंध, मूकबधिर व अस्थिव्यंग या तिन्ही प्रवर्गातील प्रवेशार्थी एकाच छताखाली विशेष शिक्षण घेऊ शकतात हे या संमिश्र केंद्राचे वैशिष्ट्य आहे. अंबाजोगाई च्या शासकीय दिव्यांग केंद्राला नाविन्यपूर्ण बदलासाठी लोकसहभागातून मदतीची गरज आहे.

संगणक व डिजिटल शिक्षणासाठी संगणक संच वाढवणे , प्रोजेक्टर व इतर साधनसामग्री मिळवणे तसेच वसतिगृहासाठी नवीन बेड व गाद्या ,वॉटर फिल्टर मिळणे आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय संमिश्र केंद्रात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन शासकीय दिव्यांग केंद्राच्या अधीक्षक सौ ज्योती पानसरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...