आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव:शेख कुटुंबीयांना सरकारने मदतीचा हात द्यावा : पाटोळे

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वरपगाव येथील मुक्तार शेख या तरुणाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या घरावर लावलेला तिरंगा ध्वज कलल्याने व्यवस्थित करीत असताना विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या कुटूंबाला शासनाच्या वतीने मदत देण्याची मागणी होत आहे.

शिव संघर्ष ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी शेख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. उच्च शिक्षित असलेल्या मुक्तार शेख याच्या अकाली मृत्यूमुळे या कुटुंबातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा असे कुटुंब उघड्यावर पडले आहे. ऐन हाताशी आलेला मुलगा गेल्याने शेख कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावलेले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तिरंग्याचा सन्मान करताना वीरमरण आलेल्या मुक्तार शेख यांच्या कुटुंबास शासनाने आर्थिक मदत द्यावी व या कुटुंबाला सावरण्यासाठी बळ द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पाटोळे यांनी केली आहे. यावेळी सरपंच संदीप देशमुख, ग्रामसेवक छञभुज चिंचकर, वडील अशोकद्दीन शेख, दिलीप देशमुख, अंकुश देशमुख, पांडुरंग भोसले, पांडुरंग देशमुख, उमर शेख, रफिक शेख, माजिद शेख, रज्जाक पठाण, अफसर शेख, बतन शेख, इब्राहिम शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...