आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:भंडाऱ्यातील घटनेने मन सुन्न झाले, सरकारने प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी : पंकजा मुंडे

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात नवजात शिशूंच्या मृत्यूने मन सुन्न झाले, सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून पंकजा मुंडे यांनी नवजात बालकांच्या कुटुंबीयांविषयी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. "भंडा-यातील अग्नितांडवात नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने मन सुन्न झाले. या घटनेने चिमुकल्यांच्या माता पित्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करते. सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी" अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात 10 नवजातांचा मृत्यू

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 बालकांना वाचवण्यात यश आले आहे. या SNCU मध्ये दोन युनिट आहेत यापैकी मॉनिटर रूममध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालकांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...