आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा\निपुण भारत अंतर्गत तालुक्यातील सोनीमोहा येथील जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षणाधिकारी (मा.) नानाभाऊ हजारे यांनी गुरुवारी (ता.५ जानेवारी) दुपारी भेट दिली. त्यांनी तिसरीच्या वर्गावर जाऊन हातात खडू घेत तिसरीच्या वर्गावर इंग्रजी विषयाचे धडे दिले. यावेळी इंग्रजीचे संभाषण कसे करायचे, तिसरी लिपी कशी लिहायची, इंग्रजीमध्ये नावे कशी लिहायची यासंबंधी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांचा उत्साह पाहून विद्यार्थीही आनंदून गेले. निपुण भारत अंतर्गत शिक्षण विभागाकडून शाळेच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येत आहे.
शाळेने दिलेली माहिती अचूक आहे का याची पाहणी विद्यार्थ्यांना भेटून घेण्यात येत आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनीमोहा येथे अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील सर्व अभिलेखे परिसर आदी बाबींची त्यांनी पाहणी केली. पाच विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यात आली.
याचबरोबर त्यांनी खडू हातात घेऊन तिसरीच्या वर्गावर इंग्रजी विषयाचे धडे दिले. इंग्रजीमध्ये तिसरी लिपी कशी लिहायची? स्वतःची नावे कसे काढायचे? इंग्रजीमध्ये लहान शब्दात कसे संभाषण करायचे? साधे शब्द कसे वापरायचे? आदी बाबी त्यांनी विद्यार्थ्यांना अगदी सहजतेने शिकवल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद दिला. शाळेच्या सर्व उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. वर्गांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विभागीय आयुक्तांचे निर्देशानुसार ऍस्ट्रॉनॉमी क्लब, वाइल्ड क्लब, वाचनालय, शालेय पोषण आहार, परमवीर चक्र विजेते, जाग, शाळा उपक्रम, भारतीय ऑलंपिक पदक विजेते शाळेत राबवत असलेले विशेष उपक्रम आणि त्यांची अभिलेखे या सर्व बाबी पाहून समाधान व्यक्त केले. जि.प.प्रा.शाळेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींबरोबर साहेबांनी शैक्षणिक चर्चा केली.
तसेच सोनिमोहा शाळेसाठी सर्व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देऊन पूर्तता करण्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी यापेक्षा अधिक गतीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण, सहशिक्षक मकरध्वज आंधळे, सोमनाथ स्वामी, शेषनारायन घोळवे, अंकूश जगदेव, रखमाजी निर्मळ, विजय राठोड, सविता गवलवाड, कल्पना साळवे, राजेभाऊ तोंडे आदी उपस्थित होते.पशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनीमोहा येथे अध्यापन केले.
आठवड्यातून तीनदा इंग्रजीतून परिपाठ घ्या शाळा भेटीच्यादरम्यान परिपाठ हा आठवड्यातून दोन ते तीन दिवस इंग्रजीतून घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांचा इंग्रजीमध्ये संवाद वाढवावा. उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून अधिक अधिक गुणवत्ता कशी वाढवता यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही उपशिक्षणाधिकारी हजारे यांनी केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.