आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफलाइन अर्ज:ग्रा.पं.चे अर्ज आता ऑफलाइन दाखल करण्याची व्यवस्था

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणूकांसाठी संगणकप्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.

यात जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीचे निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे दि. २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत संगणक प्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिल्या आहेत. इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने ऑफलाईन स्विकारण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ दि. २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...