आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारीने हल्ला:ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद टोकाला; भाच्याने केला मामावर तलवारीने हल्ला

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला जाऊन भाच्याने मामावर तलवारीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री बीड शहरातील राजीव गांधी चौकात घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत चार जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला गेला. आरोपी धोंडी राम जाधवला शनिवारी दि.१७ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले अशी माहिती सहायक निरीक्षक अमोल गुरले यांनी दिली.

शिवाजी चव्हाण (रा. दगडी शहाजानपूर, ता. बीड) हे माजी सरपंच असून गावातीलच धोंडीराम जाधव हा त्यांचा भाचा आहे. दगडी शहाजानपूरमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. पाच सदस्य बिनविरोध निवडले असून दोन सदस्यांसह सरपंच पदासाठी निवडणूक आहे. धोंडीराम जाधवची पत्नी सदस्यपदासाठी बिनविरोध निवडून आलेली आहे. शुक्रवारी सायंकाळी राजीव गांधी चौकात शिवाजी चव्हाण यांना फोन करून धोंडीरामने बोलावून घेतले. चव्हाण तेथे जावई विठ्ठल मस्के यांच्यासह पोहोचले. यावेळी धोंडीराम जाधव हा जीपमधून (एमएच २० बीसी-७७२२) सचिन देवकर व अन्य दोन अनोळखींसह तेथे पोहोचला. तुम्ही प्रचार करू नका; मला उपसरपंच व्हायचे आहे, असे म्हणून वाद घातला व तलवारीने वार केला.

तुम्ही प्रचार करु नका म्हणत वार
तुम्ही प्रचार करू नका; मला उपसरपंच व्हायचे आहे, असे आरोपीने मामाशी वाद घातला व तलवारीने वार केले. या हल्ल्यात शिवाजी चव्हाण हे जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात जखमी शिवाजी चव्हाण यांचा जबाब नोंदवला. दरम्यान मतदानाचा पूर्वसंध्येला वाद टोकाला पोचल्याने या घटनेनंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

बातम्या आणखी आहेत...