आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर - कारचा भीषण अपघात; 1 ठार, 2 गंभीर:मतदानासाठी गावी येताना पाडळसिंगी येथे कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील घटना

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथून गावी मतदानासाठी येत असताना भरधाव कार ट्रँक्टरला धडकली. या भीषण अपघातात एक जण ठार झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. हि घटना गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर घडली. गणेश बाबुराव अडाळे (वय 30 वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भाटेपुरी येथील गणेश बाबुराव अडाळे (वय 30 वर्षे), विलास बाबुराव चव्हाण , सिताबाई भास्कर अडाळे व अन्य एक जण पुण्यात स्थाईक असलेले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावी कार क्र. (एम.एच.14 जी.यु.7052) मधून येत होते. दरम्यान त्यांची कार तालुक्यातील पाडळसिंगी जवळ आली असता समोरुन आलेल्या ट्रँक्टरला धडकली.

हा अपघात ऐवढा भिषण होता इ, यामध्ये ट्रँक्टरचे दोन तुकडे झाले, तर कारचा चक्काचूर झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात चालक गणेश अडाळे समोर बाजुला बसलेले विलास बाबुराव चव्हाण गंभीर जखमी झाले, तर सिताबाई अडाळे व अन्य एक जण किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर ट्रँक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गणेश अडाळे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गणेश अडाळे याचा मृत्यू झाला. तर विलास चव्हाण व सिताबाई अडाळे यांच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...