आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:वैद्यनाथ गणेशोत्सवाचे थाटात उद‌्घाटन, माजलगावसह आष्टीत आज रक्तदान

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरू असून परळी येथे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्याचे मोठ्या थाटात उद‌्घाटन झाले. आष्टी येथे शुक्रवारी (ता.२ सप्टेंबर) गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर होणार आहे. यासह माजलगाव येथेही मुक्ताई फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिर पार पडणार आहे.

परळी येथे नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन पार पडले. या वेळी व्यासपीठावर अभिनेत्री स्पृहा जोशी, हेमांगी कवी, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड, पूनम कुडाळकर यांचीही उपस्थिती होती. यासह माजी आ. संजय दौंड, राजकिशोर मोदी, अजय मुंडे, वाल्मिक कराड, विष्णुपंत सोळंके, संगीता तुपसागर, लक्ष्मण पौळ, बालाजी मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, प्रा.विनोद जगतकर, शकील कुरेशी आदी उपस्थित होते. सूत्र संचालन अनंत इंगळे आभार सचिव नितीन कुलकर्णी यांनी मानले. परळीच्या मातीशी माझी नाळ घट्ट जोडलेली आहे. इथल्या माणसाचे सुख-दुःख हे माझे आहे, असे समजून मी सेवाकार्य करत आलो आहे. माझ्या प्रत्येक लढाईत माझ्यासाठी लढणारी माझी ही जनता हा माझा प्राण आहे, असे उद्गार माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहेत. दरम्यान, उद‌्घाटन सोहळ्यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास परळीकरांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

माजलगावात विविध उपक्रम
मारजलगाव येथील मुक्ताई अर्बन फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवात मनोरंजक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान विविध कार्यक्रमाची रेलचेल अनुभवयास मिळणार आहे.२ सप्टेंबर रोजी महारक्तदान शिबिर होणार आहे. यासह एका भाग्यवान विजेत्याला स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोक गाणी शाहीरी जलसा पार पडेल. ४ सप्टेंबरला गायन स्पर्धा, ५ सप्टेंबर रोजी नृत्य स्पर्धा, ६ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर मेश्राम यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. ७ सप्टैंबर रोजी पूजा काळभोर यांचा ‘न्यू होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम होणार आहे तर ८ सप्टेंबर रोजी सोपान महाराज सानप यांचे प्रबोधनपर किर्तन सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. आहे.
एसकेएचमध्ये श्रींची स्थापना
बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयात ढोलताशांच्या गजरात व लेझीम पथकाच्या मिरवणुकीने गणेश मूर्तीची आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सव काळात एक ते आठ सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, महाआरोग्य तपासणी शिबिर, रॅम्प वॉक स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बॅडमिंटन, रांगोळी, चित्रकला, वादविवाद, संगीत खुर्ची, हॉलीबॉल, नृत्य आदीं स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आदर्श गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय गिरी, उपाध्यक्ष अशितोष जोजारे यांनी दिली. दरम्यान, मूर्ती स्थापनेप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गणरायांचे भव्य स्वागत केले.
अंबाजोगाईत हसऱ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
शहरातील तरुण गणेश मंडळ, कुत्तर विहीर येथील पारंपरिक गणेश उत्सवाच्या ६० व्या वर्षीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना युवा नेते श्रीकांत धायगुडे व त्यांच्या पत्नी सोनल धायगुडे यांनी केली. या वेळी उपस्थित मंडळातील ज्येष्ठ सदस्य व पदाधिकारी गणेश मसने, प्रल्हादराव कातळे, विष्णु कदम, भरत सर बलूतकर, कालू शेख, सुनिल काळे, सचिन सावरे, संतोष कापसे, अध्यक्ष- संतोष काळे, भारत कदम, मंगेश बलूतकर, कृष्णा मसने, परमेश्वर कदम, रोशन कातळे, अभिमन्यू काळे, अक्षय काळे, राजाभाऊ हांगे इतर पदाधिकारी उपस्थित होते. गणेश मंडळाच्या वतीने उत्सव काळात शहर व परिसरात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शिवछत्रपती गणेश मंडळ
वडवणी तालुक्यातील धुनकवाड क्रमांक २ येथील शिवछत्रपती धुनकेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत गणेश मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी रमेश भोसले, उपाध्यक्षपदी शिवराज भोसले, अविनाश मुसळे, सचिवपदी बाबादेव काळे, कोषाध्यक्षपदी रामेश्वर साठे व कार्याध्यक्षपदी पवन मुसळे यांच्यासह कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून धुनकवाड क्रमांक दोन येथे शिवछत्रपती धुनकेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केल आहे. गणेशाची स्वागत मिरवणूक मार्गदर्शक प्रा.अशोक भोसले व मिरवणूक प्रमुख प्रदिप बोडके, ज्ञानेश्वर यादव, प्रदिप भोसले, गणेश कांबळे, शिवाजी काळे, पंकज डोंगरे, गणेश काळे, सहसचिव गणेश भोसले,सहकार्याध्यक्ष अनिल भोसले, सदस्य करण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बातम्या आणखी आहेत...