आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाज आक्रमक:शिरूरमध्ये मराठा समाजाचा महामोर्चा

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये महामोर्चा झाल्यानंतर आता ३ ऑक्टोबर रोजी शिरुर शहरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत तहसिलदारांना निवदेन दिले गेले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे. यात, जिल्हाभरातील मराठा समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन केल गेले आहे. शिरुर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय या दरम्यान हा महामोर्चा सकाळी ९ वाजता निघणार आहे.

बातम्या आणखी आहेत...