आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी का लिहितो? लिहिते:दुःख आणि वेदना प्रत्येकाला लिहिते करते : किन्हाळकर

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुः ख, वेदना आणि अपेक्षा माणसाच्या या भावना आपल्याला लिहायला लावतात, असे मत कवयित्री वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘मी का लिहितो? लिहिते ?’ या विषयावर आयाेजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून त्या बाेलत हाेत्या. या परिसंवादात दीपाताई क्षीरसागर, सुरेंद्र पाटील, आसाराम लोमटे, रमेश रावळकर, संदीप जगदाळे, विजय जाधव, संदीप जगदाळे हे सहभागी झाले. किन्हाळकर म्हणाल्या, जन्म आणि मृत्यू हे आपल्या जीवनाचे दोन टोक आहेत, त्यात आपले आयुष्य असते, एक डॉक्टर म्हणून मी संवेदनशील आहे, डॉक्टरकीच्या सेवेत काम करताना समाजातील दुःख मला दिसते.

सुरेंद्र पाटील म्हणाले, वडिलोपार्जित ५० एकर जमीन शासनाने संपादित केली. जगण्याचे साधन गेल्याने आमच्या कुटुंबावर पहिली मोठी जखम झाली. १९९३ ला दुसरी जखम किल्लारीच्या भूकंपाने झाली. त्यात हजारो माणसे जमिनीत गाडली गेली. त्यात जवळचे व आप्तस्वकीय मृत्युमुखी पडले. त्याचा मनावर मोठा आघात झाल्याने वेदनेतून लिहिता झालो. रमेश रावळकर यांनी लिहिणे ही भाषिक कृती असून खतटंचाईमुळे शेतकरी हतबल होतो, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हाल पाहून मी लिहिता झालो. दीपाताई क्षीरसागर यांनी लेखनाची सुरुवात ही अगोदर कवितेतून होत असते. माझी आई कवयित्री असल्याने संस्काराचे बाळकडू मला घरातच मिळाले. महिलांविषयी लिहिण्यास मला अधिक रस असून त्यांच्या अंतर्मनात जाऊन त्यांच्याविषयी जाणून घेता आले. विजय जाधव यांनी गोदावरी नदीतून होणाऱ्या बेसुमार वाळू उपशामुळे माझ्या गावात दुष्प्रवृत्ती वाढल्याने माझे मन अस्वस्थ होत होते. त्यातून मी ‘पांढरकवड्या’ नावाचे पुस्तक लिहिले.

बातम्या आणखी आहेत...