आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांचा अतिरिक्त भार:गट प्रवर्तक, आशा स्वयंसेविकांचा भरपावसात मोर्चा ; मोबदला मिळत नसल्याने आक्रमक

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांना विचारात न घेता त्यांच्यावर कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्याने त्यांच्या मूळ कामावर विपरित परिणाम होत आहे. त्यांना मिळणारा मोबदला तुटपुंजा असून तोही वेळेवर मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांनी महाराष्ट्र आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि.१२ रोजी भरपावसात जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोविड १९ लसीकरणांतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सक्तीने कामे लावण्यात आली. याबाबत कोणताही मोबदला दिला गेला नाही. आशा स्वयंसेविकांची नेमणूक कामावर आधारित मोबदला या तत्त्वानुसार करण्यात आली असून मूळ कामे करण्यासाठी वेळ मिळाला नाही. कोविडपूर्व काळात प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षाही सध्या खूप कमी मोबदला मिळतो. शासनाने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांची केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मिळणारा मोबदला नियमित महिन्याच्या पाच तारखेपर्यंत द्यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. शहरातील बार्शी रोडवरील संत भगवानबाबा प्रतिष्ठान येथून दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...