आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:नागनाथ विद्यालय नागतळा येथे गट अभ्यास उपक्रमाची सुरुवात‎

आष्टी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नागतळा येथील नागनाथ‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय‎ येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय‎ अभ्यास करणे सोपे व्हावे. या उद्देशाने‎ प्राचार्य डॉ. डी. बी. राऊत यांच्या //"गट‎ अभ्यासिका उपक्रमाची सुरुवात करण्यात‎ आली. या उपक्रमांतर्गत ५ वी ते १२ वी‎ वर्गातील विद्यार्थी यांच्या संख्येनुसार ४ ते‎ ५ विद्यार्थांचा प्रत्येकी एक गट बनविण्यात‎ आला आहे, असे प्रत्येक वर्ग निहाय‎ एकूण आठ ते बारा गट तयार करण्यात‎ आले आहेत ‎.‎ सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेनऊ‎ ते दहा असे विषयनिहाय ५ वी ते १२ वी‎ वर्गांचे गट नियोजन बनविण्यात आले‎ आहे. विद्यार्थ्यांच्या शंका निरसन, त्यांना‎ मार्गदर्शन त्यांच्यावर देखरेख व नियंत्रण‎ ठेवण्यासाठी संबंधित विषयाच्या‎ वेळापत्रकानुसार विषय शिक्षकाची‎ नेमणूक केलेली आहे. विशेषतः आता‎ होणाऱ्या १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा‎ देणाऱ्या विदयार्थ्यासाठी गट अभ्यास हा‎ उपक्रम, परीक्षेच्या तयारीसाठी अधिक‎ उपयुक्त ठरत आहे.

या उपक्रमामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थी आपल्या गटातील विद्यार्थ्याकडून‎ योग्य मार्गदर्शन घेत असून आपल्या‎ समस्या सोडवत आहेत. इंग्रजी, गणित व‎ विज्ञान हे कठीण विषय सहज आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्षमतेने शिकण्यास व समजून‎ घेण्यास प्रत्येक विद्यार्थ्यास मदत होत आहे‎ कठीण संकल्पना समजण्यास मदत होत‎ आहे हुशार मुलांच्या मदतीने अभ्यासतंत्र,‎ स्मरण तंत्र अवगत करत असल्याने‎ परीक्षेची तयारी करणे त्यांना सोपे जात‎ आहे. विद्यार्थी शिस्तीचे पालन करत‎ असल्याने, त्यांची निर्णयक्षमता वाढत‎ आहे. एकमेकांना विद्यार्थी अभ्यास‎ करण्यास प्रेरीत करत असल्याने, ते‎ सर्वगुणसंपन्न बनत असून, यशाच्या‎ दिशेने वाटचाल करत आहेत.

गट‎ अभ्यासामुळे सर्वसमावेश्यकता येत‎ असल्याने त्यांच्यावर वैयक्तिक‎ जबाबदारी येत आहे .‎ या उपक्रमामुळे ५ वी ते १२ वी वर्गातील‎ विद्यार्थी सकाळी सव्वानऊ वाजता‎ शाळेच्या प्रांगणात उपस्थित राहत आहेत‎ व त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्मााण‎ होत आहे या उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ.‎ डी.बी. राऊत , त्यांचे सहशिक्षक बी वाय‎ शिंदे, प्रा. सुरेश औटे, प्रा. आश्रुबा भोराडे ,‎ प्रा. राम बनसोडे, प्रा. आर बी. तळेकर,‎ एस पी गदादे, डी.टी. शिंदे, एस एल घुमरे,‎ जी के दळवी, एस. आर. राऊत, पी के‎ गर्जे यांनी गट अभ्यास हा अभिनव उपक्रम‎ नागतळा ग्रामीण परिसरातील नागनाथ‎ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात‎ सुरू केल्याबद्दल विशेष कौतुक होत‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...