आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न:वाढती लोकसंख्या, जागा अपुरी, आता राहायचे कुठेॽ धनेगावकरांपुढे प्रश्न

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धनेगाव (ता. केज) हे गाव मांजरा धरणापासून जवळ वसलेले आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना आता वास्तव्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे घर बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्याने गावात राहायचे कुठे? असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. वस्ती वाढीसाठी रिकामी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न आता तहसील प्रशासनापुढे आहे.

बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शहरे व गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणाच्या निर्मितीसाठी अनेक गावांचे पुनर्वसन केले होते, तर धरणापासून जवळच असलेल्या धनेगावात वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. परिणामी, गावात राहायचे तर घर बांधकाम करायचे कुठे, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. गावातील काही कुटुंबे धनेगाव कॅम्प येथे वास्तव्यास आहेत.

गावात ग्रामपंचायतीच्या हद्दीत काही ठिकाणी रिकामी जागा आहे. मात्र ही जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा राहण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन वस्ती वाढीसाठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रिकामी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा पँथर संघटनेचे प्रमुख जयसिंग गायकवाड, जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जागा उपलब्ध न झाल्यास आंदोलन
धनेगाव येथील रहिवाशांना वाढत्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत हद्दीत राहण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी हद्दीतील रिकाम्या जागा या नवीन कुटुंबास द्याव्यात. अन्यथा युवा पँथर संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने बोंब मारो आंदोलन करू.-जयसिंग गायकवाड, प्रमुख, युवा पँथर संघटना.

बातम्या आणखी आहेत...