आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा:पालकमंत्री बीडचे शेतकरी नाराज ; 21 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील शेतकरी पालकमंत्री अतुल सावेंवर नाराज झाले आहेत. शेतकऱ्यांनी सांगितले की, तक्रारी करूनही पीक विमा कंपनी सर्व्हे करत नाही. बीड तालुक्यात २१ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. लाखो तक्रारी पेंडिंग असून सगळा गोंधळ कारभार पीक विमा कंपनीने लावला असून १० हजार शेतकऱ्यांची निवेदने शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लावावेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्याच्या अभियानास कालपासून सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री अतुल सावेंवरही शेतकऱ्यांची नाराजी आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीकडे सावे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चौसाळा, घाटसावळी, नाळवंडी, ताडसोन्ना, पालवन, पिंपळनेर, माळापुरी, मैंदा, कुर्ला, आंबेसावळी, नामलगाव या गावांमधून शेतकऱ्यांनी निवेदने पाठवली आहेत.

बातम्या आणखी आहेत...