आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी:नागपंचमीनिमित्त आदर्श बालवाडी आणि माउली प्राथमिक विद्यालयात मार्गदर्शन

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपंचमी सणानिमित्त आदर्श बालवाडी व माऊली प्राथमिक विद्यालय बीडच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात श्रावण महिन्यात येणाऱ्या या सणाचे महत्व, नैसर्गिक दृष्टीकोनातून सण कसे साजरे केले जातात याविषयी सहशिक्षिका वंदना आवाड व मोराळे यांनी माहिती दिली. तसेच नागपंचमीच्या सणाच्या दृष्टीने साप हा शेतकऱ्याचा शत्रू नसून मित्र कसा आहे याविषयी माहिती देण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष माने यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सहशिक्षिका संजीवनी थिटे,आवाड वंदना, योजना स्वामी, अंकिता डोरले, प्रतिभा मोराळे यांनी विविध नागपंचमीचे गीत सादर केले.

बातम्या आणखी आहेत...