आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘एक दिवस बळीराजासाठी’ मोहिमेतून मार्गदर्शन

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नाव्होली येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी व विविध योजनांबाबत कृषी तज्ञांनी माहिती देत चर्चा केली. राजमा (घेवडा) पिकाच्या प्लॉटची पाहणी करीत या पिकाचे तंत्रज्ञान व खरेदी-विक्री संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांना भेटी देत चर्चासत्र, पाहणीतून शेतकऱ्यांना फळबाग, भाजीपाला, पिकांविषयावर मार्गदर्शन केले.

जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मस्साजोग (ता.केज) मंडळातील विविध गावांत जिल्हा मासिक चर्चासत्र, पाहणी दौऱ्यातून शेतकऱ्यांना लागवडीसह किड रोगांच्या प्रतिबंधाविषयी मार्गदर्शन केले.

मस्साजोग मंडळात जिल्हा मासिक चर्चासत्र व पाहणी दौऱ्यावेळी शुक्रवारी (दि.१८) जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर, उपविभागीय कृषि अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. एस. व्ही. सूर्यवंशी, कृषि विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विषय तज्ञ नरेश जोशी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने, मस्साजोगचे मंडळ कृषि अधिकारी विकास अंभोरे, केजचे मंडळ कृषि अधिकारी, वर्षाराणी कदम, युसूफ वडगावचे मंडळ कृषी अधिकारी नागेश येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

सारुळ येथील अशोक ढाकणे यांच्या सीताफळ व बोर फळबागेची पाहणी करून मार्गदर्शन केले. सारणी (सां.) येथील घोळवे यांच्या भाजीपाला नर्सरी व पॉलिहाऊस ची पाहणी करून कीड व रोगांचे व्यवस्थापन व लागवडीचे तंत्रज्ञान याविषयी तज्ञांनी माहिती दिली. अरणगावचे सुहास सिरसाट यांच्या शेतात ‘शून्य मशागत’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून हरभरा प्लॉटची पाहणी केली.

पाचटापासून खत निर्मितीचे प्रात्यक्षिक
नाव्होली येथे कापूस फरदळ मोहिमेंतर्गत प्रत्त्यक्ष कापसाच्या प्लॉटला भेट देऊन शेतकऱ्यांना फरदळ टाळावी याविषयी माहिती देण्यात आली. तसेच हरभरा पिकाची ‘सीड ड्रम आधारित बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवून महत्व पटवून दिले. सुर्डी फाटा येथे ऊस पिकाच्या तोडणीनंतर राहिलेले पाचट जाळून न टाकता पाचटाची कुट्टी करून खत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यकांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...