आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कृषी विभागाकडून आपत्कालीन पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन आठवड्यांपासून पाऊस न पडल्यामुळे शेंग अवस्थेमध्ये असलेल्या सोयाबीन पिकाची पाने कोमेजून जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर शेतीशाळेतून मार्गदर्शन केले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत नांदडी, ममदापूर येथे शेतीशाळा पार पडली. पावसाच्या खंडामध्ये पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी विहीर, बोरवेल किंवा शेततळ्यात पाणी असल्यास पिकांना स्प्रिंकलर किंवा ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे. फुलांच्या अवस्थेमध्ये असलेल्या सोयाबीनला स्प्रिंकलरद्वारे पाणी देताना नोझलची संख्या वाढवून पाण्याचे प्रेशर कमी ठेवावे यामुळे फुलगळ होणार नाही तसेच कापूस तूर पिकामध्ये हलक्‍या कोळपण्या कराव्यात, पिकांना मातीची भर द्यावी. कोळपणीमुळे भेगा बुजविल्या जातात. याद्वारे ओलावा साठवून ठेवण्यात मदत होते.

जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पानांचे तापमान वाढते, पाने कोमेजतात, पानाच्या पृष्ठभागावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते, पानातील अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. त्यामुळे पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) या विद्राव्य खताची ८० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाच्या पानांतील अन्न तयार करण्याची क्रिया गतिमान होण्यास मदत होते आणि पिके जमिनीतील ओलावा शोषणास सुरुवात करतात या संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे, केशव चाटे, शेतकरी दत्तात्रय यादव, बालाजी लोखंडे, भिवाजी यादव, शकुंतला शिंदे, बलभीम शिंदे, सुमन शिंदे, दीपक शिंदे, अंगद शिंदे, अशोक गायकवाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...