आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूलचे यश‎:शिकाई मार्शल आर्ट विभागीय स्पर्धेत‎ गुरूकूल स्कूलचे यश‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल‎ गारखेडा येथे झालेल्या शालेय शिकाई मार्शल आर्ट‎ विभागीय स्पर्धा संपन्न झाल्या. संपन्न झालेल्या स्पर्धेत‎ बीड शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल व गुरुकुल‎ पब्लिक स्कूलने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.‎

औरंगाबाद येथे १८ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या‎ स्पर्धा क्रीडा युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे,‎ औरंगाबाद जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा‎ कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आल्या‎ होत्या. या स्पर्धेत गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या १० व‎ गुरुकुल पब्लिक स्कूलच्या ३ खेळाडूंची विभागीय‎ स्पर्धेसाठी निवड झाली.‎

बातम्या आणखी आहेत...