आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा जप्त:पात्रुड येथे साडेसात लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा

माजलगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरीत्या गुटखा पोहोचवला जात असल्याचे कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पात्रुड येथे छापा टाकला. बुधवारी (१५ जून) रात्री ११ वाजेदरम्यान केलेल्या कारवाईत सात लाखांच्या गुटख्यासह दोन्ही वाहनांना ताब्यात घेतले. माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बुधवारी धोंडिराम मोरे, आतिशकुमार देशमुखांसह पाेलिसांनी सापळा रचला. पिकअपमधून (एमएच ०५ बीएच ०९३४) पांढऱ्या रंगाच्या पिशव्या कारमध्ये (एमएच ०४ जीडी ३९९७) टाकण्यात येत होत्या. पोलिसांनी त्या पकडल्या. या वेळी पोलिसांनी दाेन वाहनांसह गुटखा असा एकूण अंदाजित १४ लाख ९७ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. गुरुवारी पोलिस नाईक आतिशकुमार देशमुख यांच्या तक्रारीवरून आसेफ कडुमियाँ शेख, खमर इनामदार (दाेघे, रा.पात्रुड) व त्रिंबक डुकरे (रा. मनूर) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...