आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नैतिक मार्गाने मिळवलेल्या धनाने आनंद; भिक्खू हर्षबोधी थेरो यांचे प्रतिपादन

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक माणूस जन्मत: बरोबर काही घेऊन येत नाही व माणसाचा मृत्यू झाल्यानंतर देखील बरोबर काहीही घेऊन जाऊ शकत नाही. फक्त त्याच्या कुशल कर्माने तो त्याच्या पश्चात ओळखला जातो. त्यामुळे नैतिक मार्गाने मिळविलेल्या धनाने आनंद व पुण्य मिळते. तथागतांनी उपदेशीलेल्या दहा दान पारमितेला अत्यंत महत्व आहे. योग्य ठिकाणी दिलेल्या दानाला खुप महत्व आहे, असे प्रतिपादन भिक्खु हर्षबोधी थेरो यांनी केले.

प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था यांच्या वतीन डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन नगर मौजे शिवणी येथे धम्म हॉलमध्ये ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, गुरू रविदास सत्यशोधक समाज जिल्हाध्यक्ष वचिष्ठ तावरे व बँक व्यवस्थापक वामनराव जाधव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. सर्व प्रथम भिक्खु हर्षबोधी थेरो व भिक्खु धम्मशील यांच्या हस्ते तथागतांच्या प्रतिमेस पुष्प तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितीत उपासक, उपासिकांना त्रिसरण-पंचशील ग्रहण करण्यास दिले.

भिक्खु हर्षबोधी म्हणाले, तथागतांनी सांगितलेला मार्ग विज्ञानवादी आहे. प्रज्ञा म्हणजे सत्य जाणणे होय व सत्य हे लपत नाही. ते पराजीत होत नाही तरी चार आर्य सत्य जाणणे, पंचशील, आर्य आष्टांगिक मार्ग व दहा पारमिता जाणून घेऊन त्यानुसार आपले आचरण ठेवणे हाच जीवनात दु:ख मुक्तीचा मार्ग आहे, असे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केले. भिक्खु धम्मशील यांनी तथागतांनी उपदेशीलेला कम्म सिध्दांत (कम्मविपाक) मरणावस्थेत असलेला राजा व चार राण्या या बोध कथेतून माणसाने कुशल कर्म करणे किती गरजेचे आहे व त्या कर्माचे फल कसे सुफल असते हे सविस्तरपणे समजावून सांगितले.

या प्रसंगी प्रत्येकाने दान पारमितीचे महत्व जाणून डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर येथे होत असलेल्या विकास कामांत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. प्रदीप रोडे यांनी भोजनदान तर जया सुरेश डोळस यांनी खिरदान दिले. कार्यक्रम प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेचे बहुसंख्य सदस्य व बीड शहरातील व उपासक, उपासिका हजर होत्या.

शांती व सद्भावनेचा मंत्र प्रत्येकाने जोपासणे गरजेचे
भगवान गौतम बुध्द यांनी जगाला शांती व सद््भावनेचा मंत्र दिला. हा मंत्र जागतिक शांततेसाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत असताना आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज जगाची परिस्थिती पाहता प्रत्येकाची हीच भावना असेल तर शांतता दीर्घ काळ टिकू शकते, असे प्रतिपादन भिक्खु धम्मशील यांनी केले. याप्रसंगी जिल्हा क्रीड अधिकारी अमर विद्यागर, सत्यशोधक समाजाचे प्रतिनिधी तावरे यांनीही मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...