आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर बांधण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत व चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ करण्यात आल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सारिका सुनिल खंडागळे (३०, रा. म्हारळगाव जि. कल्याण, हमु, बीड) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन पती सुनिल सर्जेराव खंडागळे, सासरा सर्जेराव खिराजी खंडागळे, सासू कांताबाई सर्जेराव खंडागळे आणि नणंद संगिता रविंद्र गवळी (सर्व रा. म्हारळगाव जि. कल्याण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...