आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय:दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ ; शिवाजीनगर पोलिसांत चार जणांविरोधात गुन्ह्याची नोंद

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर बांधण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत आणि चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ करण्यात आल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. सारिका सुनिल खंडागळे (३०, रा. म्हारळगाव जि. कल्याण, हमु, बीड) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, घर बांधकाम करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून त्याचा पती सुनिल सर्जेराव खंडागळे, सासरा सर्जेराव खिराजी खंडागळे, सासू कांताबाई सर्जेराव खंडागळे आणि नणंद संगिता रविंद्र गवळी (सर्व रा. म्हारळगाव जि. कल्याण) यांनी छळ केला. तर, चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिविगाळ करुन मारहाण करण्यात आली व घरातून हाकलून देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...