आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा छळ:ट्रॅक्टरची मागणी करत विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टर घेण्यासाठी आईवडिलांकडून २ लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांनी एका ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना चोरांबा (ता. धारूर) येथे घडली. पतीसह पाच जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. केज शहर माहेर असलेल्या चित्रकला लखन भालेराव (३०) या महिलेचा विवाह चोरांबा येथील लखन शेषराव भालेराव यांच्याशी ११ वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवसानंतरच पती लखन भालेराव, सासू आशाबाई, शेषराव, दीर मसाजी भालेराव, दीर विशाल भालेराव यांनी छळ सुरू केला होता.

बातम्या आणखी आहेत...