आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री संत सावता माळी चौकातील श्री श्री राधा गोविंद मंदिरा तर्फे गीता जयंती निमित्त बीड ते रामगड हरिनाम संकीर्तन दिंडी, भगवद्गीता ज्ञानदान व संपूर्ण भगवद्गीता पठण कार्यक्रम पार पडला. लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गीता जयंतीच्या दिवशी श्री श्री राधा गोविंद मंदिर ते रामगड या तीर्थ स्थानापर्यंत दिंडी काढण्यात आली. “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे’ या महा मंत्राचा गजर करीत, महालक्ष्मीचे दर्शन घेऊन संकीर्तन दिंडी राम गडाला पोहोचली. याप्रसंगी राम गोविंद स्वामी महाराज यांनी “परित्राणाय साधूनामं विनाशायेच दुष्कृतां” या गीतेच्या श्लोकाद्वारे कशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पांडवांना विजयी करून कौरवांचा म्हणजेच दुष्ट शक्तींचा ऱ्हास केला व पुन्हा धर्माची स्थापना केली याची माहिती दिली.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेमध्ये भगवद्गीता ज्ञान यज्ञ पार पडला. श्रीमद् भगवद्गीतेतील संपूर्ण ७०० श्लोकांचे व १८ अध्यायाचे पठण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी इस्कॉन बीडचे अध्यक्ष विठ्ठल आनंद प्रभू, श्रवणभक्ती प्रभू, यादवेंद्र प्रभू व राधा गोविंद भक्त समाज यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती इस्कॉन बीडचे प्रतिनिधी श्रीमान कृष्ण नाम दास यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.