आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:गुरूंवर श्रद्धा ठेवा, आयुष्यात‎ काहीच कमी पडणार नाही‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत, गुरूंच्या आज्ञेवर श्रद्धा‎ ठेवावी,आयुष्यात आपल्याला काहीही‎ कमी पडणार नाही. संताचिया पायीची‎ धुळ व्हावी. यातच जीवन कृत कृतार्थ‎ होते, असे प्रतिपादन नाना महाराज‎ यांनी केले.‎ श्री गुरु बंकट स्वामी महाराज‎ यांच्या कृपेने व सुदामदेव महाराज व‎ शांती ब्रम्ह रामहरी महाराज बाबा‎ यांच्या कृपा आशिर्वादाने वै. सुदामदेव‎ बाबा यांच्या शताब्दीनिमित्त सुरु‎ झालेल्या सावंतवाडी येथील अखंड‎ हरीनाम सप्ताहात नाना महाराज कदम‎ यांचे कीर्तन झाले. ‘

संतांचिया पायी हा‎ माझा विश्वास, सर्वभावे दास झालो‎ त्यांचा’ या अभंगावर त्यांनी निरूपण‎ केले. नाना महाराज कदम म्हणाले,‎ की संत तुकाराम महाराज सांगत की‎ मला संतांवर, त्यांच्या पायी एवढा दृढ‎ विश्वास आहे की मी संपूर्णपणे आणि‎ सर्व भावाने त्यांचा दास झालो आहे.‎ तेच खऱ्या अर्थाने मला योग्य तो मार्ग‎ दाखवून किंबहुना योग्य त्या मार्गावर‎ आणून माझे सर्व हित करतील‎ जेणेकरून श्री हरी माझ्यावर कृपा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करेल.

आपणही संतांची ही वचने‎ लक्षात ठेवून आपली वर्तणूक ठेवावी,‎ असे आवाहन त्यांनी केले. यावेळी‎ गोरख महाराज वायभट, रोहिदास‎ महाराज शिंदे, मृदंगाचार्य बंडू महाराज‎ सातपुते, शंतनु महाराज धूर्वे, रणजित‎ महाराज शिंदे, हरिदास महाराज खुळे,‎ सिरसाठ महाराज, श्रीकृष्ण महाराज‎ खोसे, त्रिंबक महाराज शेळके, वसंत‎ महाराज शिंदे,

बातम्या आणखी आहेत...