आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:भक्त म्हणून आला अन्‎ देवीच्या अंगावरील‎ मंगळसूत्र चाेरून गेला‎

बीड‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रसिद्ध खासबाग देवी‎ मंदिरात दिवसाढवळ्या चोरी झाली‎ असून भक्त म्हणून दर्शनासाठी‎ आलेल्या एका व्यक्तीने देवी‎ अंगावरील पाच ते सहा ग्रॅम वजनाचे‎ साेन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही‎ घटना सीसीटीव्हीत कैद झाली.‎ खास बाग परिसरात श्री तुळजाभवानी‎ मातेचे मंदिरात सोमवारी दुपारी‎ मंदिरात लाल टी शर्ट आणि निळी‎ जिन्स पॅन्ट घातलेला एक व्यक्ती भक्त‎ म्हणून दुपारच्या वेळी मंदिरात आला‎ होता. गाभाऱ्यात जाऊन त्याने‎ गळ्यातील मंगळसूत्र काढून घेत‎ स्वत:च्या खिशात टाकले.‎

बातम्या आणखी आहेत...