आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाकलून दिले:दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीस हाकलून दिले

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली पत्नी व दोन मुली असताना पतीने दुसरे लग्न करीत पहिल्या पत्नीस घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील लव्हुरी माहेर असलेल्या मीरा आकाश इंगळे (२८) या महिलेचा विवाह ८ सप्टेंबर २०१९ रोजी आकाश अंतराम इंगळे (रा. वाघाळा कारखाना विटभट्टी, अंबाजोगाई) याच्याशी नातेवाईकांच्या परस्पर आळंदी येथे झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. तिच्या पतीच्या नातेवाईकांनी आकाश याला सोडून दे, त्याचे दुसरे लग्न करून द्यायचे असे म्हणत धमक्या देत होते. त्यानंतर पतीने ही तुला मुली झाल्या, त्या मुली ही माझ्या नाहीत असे म्हणत शारिरीक व मानसिक छळ सुरु होता.

बातम्या आणखी आहेत...