आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:परळीच्या दिल्ली स्कूलमध्ये आरोग्य तपासणी

परळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे व विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य कसे राहील या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरास परळी येथील डॉ. विजय रांदड , डॉ . राजेश जाजू, डॉ . गुरुप्रसाद देशपांडे, डॉ . संजय गित्ते , डॉ . व्यंकटेश तिडके, डॉ . तेजस्विनी मुंडे , डॉ . अजय मुंडे , डॉ . मंगेश गित्ते, डॉ. अशोक लोढा, डॉ . दिनेश लोढा, डॉ . हार्दिक लोढा, डॉ . सतीश दौंड, डॉ . अमोल होळंबे या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.

विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी, आजार टाळण्यासाठीची काळजी तसेच निरोगी व सुदृढ जिवनप्रणाली जगण्यासाठीचे प्रबोधन देखील करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शारिरिक व मानसिक आरोग्य वृद्धींगत करण्यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, व व्यामाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आयोजनाबद्दल विद्यार्थी व पालकांनी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य विठ्ठल तुपे यांचे आभार मानले. दरम्यान, दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्याबाबत जागृती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...