आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविडा ( ता. केज ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मुंबईच्या हॅबीटॅट फॉर हुम्यानीटी इंडीया ट्रस्टच्या वतीने बेड, व्हेंटिलेटर व इतर आरोग्य साहित्य भेट देण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात गरजू रुग्णांना त्याचा लाभ होणार असून रुग्णांची अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.
केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक गावांच्या रुग्णांची मदार आहे. तर रुग्णांना आवश्यक सोयी व सुविधा उपलब्ध होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी आहे. मात्र ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध नसल्याने डॉ. पवार, बिक्कड, उत्तम गायकवाड, बाबा पोटभरे, श्रीमती खराडे यांनी मुंबईच्या हॅबीटॅट फाॅर हुम्यानीटी इंडीया ट्रस्टकडे पाठपुरावा करून विडा प्राथमिक आरोग्य केंद्रास व्हेंटीलेटर, अँक्सीमिटर, पीपीई कीट, मास्क या आरोग्य साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते हे आरोग्य साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीला कांबळे, महादेव सुर्यवंशी, शिवाजी पाटील, अंकुश कलाने, दिपक वाघमारे, महादेव घाडगे, किशोर देशमुख हे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.