आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योग दिवस:निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती : शेख

परळी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा (मुलांची) येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी शरीर हीच सर्वात महत्वाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी मुख्याध्यापक शेख यांनी केले. सय्यद शाकेर, इंगळे यांनी योग प्रात्यक्षिके सादर करून दाखवली.

तसेच शिक्षिका गर्जे यांनी योगाभ्यासाचे महत्व व दैनंदिन जीवनातील फायदे याविषयी मार्गदर्शन केले. यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी सोलंकर, पठाण, इंगळे, अखिल, गायकवाड, चव्हाण आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...