आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाऊस:परळी मधील दहा गावांत दोन तासांत मुसळधार पाऊस

परळी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वैद्यनाथ कारखाना परिसरातील दहा गावांत शुक्रवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदीनाल्यांना पूर येऊन शेतात पाणी साचले. वैद्यनाथ साखर कारखाना येथील पर्जन्यमापक यंत्रावर दोन तास ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील पांगरी, लिंबुटा, तळेगाव, देशमुख टाकळी, नाथरा, इंजेगाव, बेलंबा, वाघबेट, कौठळी, संगम या गावांमध्ये सायंकाळी सुरू झालेला हा मुसळधार पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत पडल्याने नदीनाल्यांना मोठा पूर आला. यावर्षीच्या पावसाळ्यात या गावांमध्ये हा सर्वांत मोठा पाऊस असल्याचे नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांनी सांगितले. या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग या पिकांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

बातम्या आणखी आहेत...