आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील पोलीस स्टेशनच्या पाठीमागे सार्वजनिक स्मशानभूमी असून या ठिकाणी कायाकल्प फाउंडेशनच्या वतीने लोकसहभागातून विकास कामे करण्याचे कार्य मागील चार वर्षापासून हाती घेण्यात आले आहे. याच कामांत योगदान म्हणून श्रीकृष्ण मित्रमंडळ धारूर यांच्या वतीने फरशी १२ ब्रास व पेव्हरब्लॉक १४ ब्रास बसविण्यात आले आहेत. यासह विविध सामाजिक कार्यात सहभाग देण्याची ग्वाही याप्रसंगी मित्रमंडळाने दिली.
किल्लेधारूर शहरामधील सार्वजनिक स्मशानभूमी पोलीस स्टेशनच्या पाठीमागची ही सर्व मोठी सार्वजनिक समशान भूमी आहे. माळरानावर ही स्मशानभूमी असल्याच्या कारणाने या ठिकाणी सुविधा नव्हत्या. परिणामी नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी येथे येणाऱ्या किल्लेधारूर शहरातील नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी शहरातील सामाजिक संस्था कायाकल्प फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला. लोकसहभागाची कास धरत स्मशानभूमी परिसरात विविध आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे काम मागील ४ वर्षे पासून सुरू आहे. यामध्ये त्याठिकाणी तारेचे कंपाउंड, वृक्ष लागवड पेव्हरब्लॉक ब्लॉक, फरशी, झाडासाठी ठिबक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच रात्री होणाऱ्या अंत्यविधीच्या सुविधेसाठी लाईट ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून सर्व स्तरातून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत केली जात आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळाचे दीपक वसंतराव वडगावकर, अभय भास्कराव चिद्रवार, विनायक भास्करराव सातभाई, सुहास दिनेशराव चिद्रवार, अभिषेक राजकुमार पिलाजी, आनंद लिंबाजीराव भावठणकर या मित्रांनी एकत्र येत त्याच्या वतीने ही एकवीस हजार रुपये २१००० इतकी मदत कायाकल्प फाउंडेशनला दिली.
श्रीकृष्ण मित्रमंडळाने यापूर्वीही दिली मदत
स्मशानभूमीसाठी मदत देणाऱ्या श्रीकृष्ण मित्रमंडळ वतीने यापूर्वीही सामाजिक कार्यसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. या अगोदर वॉटर कप स्पर्धेच्या दरम्यान सोनिमोहा गावाला आर्थिक मदत करण्यात आली होती. तसेच निराधार व गरजू व्यक्तीच्या कुटुंबाला त्यांनी मदतीचे हात दिला आहे. वैकुंठभूमीसाठीही आर्थिक मदत केली आहे. पुढील काळात ही सुविधांसाठी सहकार्य करणार आहोत, असे आनंद भावठणकर, विश्वानंद तोष्णीवाल, सचिन चिद्रवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.