आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळी:हर्नियाच्या शस्त्रक्रियेस आता 2 हजारऐवजी 12 रुपयांची जाळी

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी मच्छरदाणीची जाळी वापरण्याबाबत विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.

ग्रामीण भागातील आशिया खंडांतील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या स्वाराती रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग हा विविध उपक्रमांसह महात्मा फुले योजनेत राज्यभरात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग अशी ओळख निर्माण झाली आहे. हर्निया या आजारावरील शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या महागड्या जाळीऐवजी अत्यंत कमी दरात सहज उपलब्ध होणाऱ्या जाळीचा वापर करून ही महागडी शस्त्रक्रिया अत्यंत स्वस्त करणारे संशोधन विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पूर्वीची ही जाळी या टंचाईग्रस्त भागातील नागरीकांकरीता खर्चिक ठरत होती. तर, बिगरजाळीच्या टाक्यांच्या शस्त्रक्रीयेमुळे रुग्णांना अनेक महीने त्रास होऊ शकतो व पुन्हा हर्निया होण्याचा वाढीव धोका असतो.

यावरील पर्यायांचा शोध घेत असताना डॉ.नितीन चाटे यांचे लक्ष दोंडाईचा येथील डॉ.रविंद्र टोनगावकर यांसह जगभरातील विवीध अल्पविकसीत देशांमधील सर्जन वापरत असलेल्या मच्छरदाणीच्या जाळीच्या उपयुक्तते कडे गेले.जगभरात यशस्वी झालेला हा स्वस्त आणि स्वस्थ पर्याय रुग्णांना नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय डॉ. नितीन चाटे यांनी घेतला. हर्नियाची जाळी पॉलिप्रॉपीलीन या केमिकल नावाची असते तर मच्छरदाणी ही पॉलीइथिलीन या शास्त्रीय नावाची. २०१८ पासुन आजपर्यंत १ हजार पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉ.चाटे यांच्या नेतृत्वात डॉ.भुषण जोगदंड, डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे व डॉ. महेश बिराजदार यांनी संशोधन सहायक म्हणून काम केले.

२० लाखांची बचत, तर योजनेतून ८५ लाखांचा महसूल प्राप्त
या जाळीच्या वापरामुळे शासनाची २० लाख रुपयांची महसूल बचत झाली तर महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेतून या प्रकारच्या शस्त्रक्रियेतून ८५ लाख रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह डॉ. सिद्धेश्वर बिराजदार,डॉ. शंकर धपाटे, डॉ. राजेश कचरे, डॉ. दीपक लामतुरे, डॉ. चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...