आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:महामार्गांची कामे रखडली; नागरी आंदोलनाचा इशारा

केज16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातून जात असलेल्या अहमदनगर ते अहमदपूर व खामगाव ते पंढरपूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे अखंडितपणे केली जात नसून रखडलेली आहेत. त्यामुळे २० जून पर्यंत तत्काळ कामे सुरू करून पूर्णत्वाकडे नेण्यात यावीत अन्यथा २१ जून रोजी केज-अंबाजोगाई रस्त्यावर केजडी पुलावर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा केज विकास संघर्ष समितीने दिला आहे.

अहमदनगर ते अहमदपूर व खामगाव ते पंढरपूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग केज शहरातून जात असून मागील तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. मात्र दोन्ही रस्त्याची कामे कासवगतीने केली जात आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून ही कामे आतापर्यंत संबंधित कंपन्या करीत आल्या आहेत. रेंगाळत होत असलेल्या कामामुळे अपघातातून अनेकांचे बळी आणि अंपगत्व पत्कारण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

तर धुळीमुके नागरिक आणि व्यापारी परेशान झाले असून शहरातील दोन्ही चौकांचे नव्याने बांधणी, सुशोभीकरण, दोन्ही महामार्गावर पथदिवे व नियम व अटीनुसार कंपन्यांनी करावयाचे वृक्षारोपण ही कामे खोळंबली आहेत. याशिवाय या दोन्ही रस्त्यावर येत असलेल्या मांजरा नदी लगतचा खराब रस्ता मुख्य व पूल वाहतुकीस उपलब्ध होईपर्यंत सुस्थितीत करणे गरजेचे आहे. रखडलेली सर्व कामे दोन्ही कंपन्यांनी २० जूनपूर्वी हाती घेऊन पूर्ण न केल्यास २१ जून रोजी सकाळी ११ वाजता केज - अंबाजोगाई रस्त्यावरील केजडी नदी पुलावर आंदोलन केले जाईल, असा इशारा केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले, नासेर मुंडे, जे. डी. देशमुख यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...