आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:जिल्हाधिकारी कार्यालयात‎ हिरकणी कक्ष झाला सुरू‎

बीड‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत‎ स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष‎ नसल्या बाबत व ज्या ठिकाणी‎ आहेत ते कुलूपबंद असल्याबाबत‎ दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत‎ केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची‎ तत्काळ दखल घेतली. बुधवारी‎ महिलादिनाचै औचित्य साधून‎ जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी‎ कक्ष सुरु करण्यात आला.‎ शासकीय कार्यालयांत‎ असणाऱ्या महिला कर्मचारी,‎ अभ्यागत म्हणून येणाऱ्या‎ महिलांपैकी स्तनदा माता असणाऱ्या‎ महिलांना बालकांना स्तनपान‎ करण्यासाठी सुविधा नसल्याने‎ गैरसोयीचा सामना करावा लागत‎ होता.

बीड बसस्थानकात असलेला‎ व जिल्हा पोलिस अधीक्षक‎ कार्यालयात असलेला कक्ष बंद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्वरुपात होता. यामुळे स्तनदा‎ मातांना उघड्यावर बालकांना‎ स्तनपान करावे लागत होते. यामुळे‎ त्यांची कुचंबन होत होती. याबाबत‎ दिव्य मराठीने ६ मार्चच्या अंकात‎ वृत्त प्रसिद्ध केले होते. याची तत्काळ‎ दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपा‎ मुधाेळ यांनी जिल्हाधिकारी‎ कार्यालयात हिरकणी कक्ष तयार‎ करण्याचे आदेश दिले होते. यानंतर‎ तातडीने हा कक्ष तयार केला.‎

एसटीकडूनही दखल‎
दरम्यान, बसस्थानकातील हिरकणी‎ कक्ष कायम कुलूप बंद असल्याची‎ बाब दिव्य मराठीने निदर्शनास‎ आणून दिल्यानंतर राज्य परिवहन‎ महामंडळाचे विभागीय नियंत्रक‎ अजय मोरे यांनीही याची दखल‎ घेतली. कक्ष सुरु ठेवण्याबाबत‎ त्यांनी सूचना दिल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...