आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे:श्री क्षेत्र नारायणगड येथून त्यांचा दौरा सुरू; संभाजीराजे छत्रपती आज बीडमध्ये

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर संस्थानचे युवराज व माजी खा. संभाजीराजे छत्रपती हे आज सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड येथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व कोल्हापूर गादीचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या स्थापनेची घोषणा राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच आज सोमवारी ते बीड जिल्ह्यात येत आहेत.

विविध विषयांवर सामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. धाकटी पंढरी नारायणगड येथे सकाळी दहा वाजता त्यांचे आगमन होईल. नारायणगड संस्थानकडून त्यांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यानंतर ते जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देणार आहेत.