आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:गुटखा नेणाऱ्या कारची धडक; तरुण ठार

वडवणी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुटखा वाहतूक करणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार झाल्याची घटना वडवणीजवळील विजयराज ऑइल इंडस्ट्रीजवळ गुरुवारी (१६ जून) दुपारी २ वाजता घडली. अपघातानंतर चालकाने कारमधील गुटखा दुसऱ्या वाहनात टाकून पळ काढला. हे पाहून दुचाकीस्वाराच्या नातेवाइकांनी बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावर एकत्र येत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी २ किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वडवणी व पिंपळनेर पोलिसांना अपघाताची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्यानंतर तब्बल २ तासांनंतर पोलिसांनी वाहतूक मोकळी केली.

तालुक्यातील ढोरवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या गाडीउतार तांड्यावरील रवी ऊर्फ भय्या बळीराम चव्हाण (२२) हा तरुण वडवणीहून बीड-परळी राष्ट्रीय महामार्गावरून तांड्याकडे दुचाकीने (एमएच २० एफएच १६१८) निघाला होता. याच वेळी महामार्गावर समोरून गुटखा घेऊन जाणाऱ्या कारने (एमएच ०३ बीसी ०४५३) दुचाकीला जोराची धडक दिली. यात तरुणाचा एक हात खुब्यापासून वेगळा होऊन डोक्याला गंभीर मार लागला.

बातम्या आणखी आहेत...