आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका:दहा वर्षांपासून महसुली मंडळ अटीचा फटका; यंदाही शेतकऱ्यांच्या मुळावर

जालिंदर नन्नवरे | शिरूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांत पपई लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढत गेले. ज्या महसुली मंडळात केवळ २० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फळबाग लागवड झाली असेल असाच क्षेत्राला कृषी व विमा कंपनीकडून विम्याचे संरक्षण होते. दहा वर्षांत तालुक्यात एका महसुली मंडळात २० हेक्टरपेक्षा अधिकची लागवड होऊ शकली नाही. यंदा तालुक्यातील सहा महुसली मंडळातील ४८ हेक्टरवर पपईची लागवड होऊनही अतिवृष्टी व हवामानातील अचानक बदलामुळे पपईवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला झाला. प्रत्येक वर्षी जरी नुकसान झाले तरी आपल्याला विमा संरक्षण मिळतच नाही ही उदासीनता शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसल्याने यंदा पपई फळबाग विमा संरक्षणाची सवलत असतांना शेतकऱ्यांनी विमा न भरल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

शिरूर तालुक्यात पिकलेली पपई मुंबई, पुणे, पंजाबसह हरियाणाच्या बाजार पेठेत जाते. या शहरात िशरूरच्या पपईला चांगला भाव मिळत असल्याने या तालुक्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदा परतीच्या पावसात झालेली अतिवृष्टी व त्यांनतर हवामानात झालेला अचानक बदल या कारणामुळे पपईवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला झाल्याने बागा उध्वस्त होऊ लागल्या आहेत.

बहारात आलेले पपई विषाणूजन्य रोगामुळे सडत असुन व्यापारी शेतकऱ्यांचा माल विकत घ्यायला तयार नाहीत. परिणामी शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. यंदा तालुक्यातील शिरूर, गोमळवाडा, ब्रम्हनाथ येळंब, खालापूरी, रायमोहा व तिंतरवणी या सहा महसुली मंडळातील ४८ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली होती. परंतु मागील दहा वर्षात शेतकऱ्यांकडून कमी-जास्त प्रमाणात फळबाग लागवड होत गेल्याने फळबाग विमा मिळु शकला नसल्याने यंदा एकाही शेतकऱ्याने पळबाग पिक विमा भरलेला नाही. तर दुसरीकडे फळबागांना विमा संरक्षण वगळता कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारची तरतूद झालेली नाही. तालुक्यातील पपईच्या नुकसानी बाबत तहसीलदारांशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काही मार्ग निघतो का ते पहावे लागले असे शिरूरचे कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी म्हटले आहे.

काय आहे कृषी विभागाचा जाचक नियम ?
फळबागाला मिळणारे विमा संरक्षण हे पीकासाठी सुरक्षा कवच मानले जात असले तरी ज्या महसूल मंडळामध्ये वीस हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. त्याच फळ बागांनाच विमा संरक्षण देण्याचे धोरण विमा कंपनी व कृषी विभागाचे आहे. शिरूर तालुक्यातील सहा महसुली मंडळात मागील दहा वर्षात केवळ २० हेक्टरपेक्षा कमी - जास्त प्रमाणावर फळबाग लागवड झाल्याने शेतकऱ्यांना फळबाग विमा मिळुच शकलेला नाही.

पपईचा विमा भरण्यास सवलत होती
फळबाग विमा स्विकारणारी कंपनी दरवर्षी नियमात बदल करत असून यंदा तालुक्यातील सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पपई फळबाग विमा भरण्यास सवलती होत्या. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडे नसते. यामुळे किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे याबाबतमाहिती उपलब्ध नाही.
-राजेंद्र नेटके, कृषी अधिकारी, शिरूर कासार

मी पीक विमा भरणे टाळले
मागील दोन वर्षांपासून मी पपई फळबाग लागवड करीत आहे. पपई पिकावर अशा प्रकारचा विषाणूजन्य आजार किंवा इतर नैसर्गिक आपत्ती येतात. याची मला कृषी विभाग व सल्लागारांनी माहिती दिली नाही. त्यामुळे मी पिक विमा भरणे टाळले आहे. -सुरेश काळे, शेतकरी, आर्वी

बातम्या आणखी आहेत...