आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधीक्षक:गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश ; नंदकुमार ठाकूर बीडचे नवे पोलिस अधीक्षक

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती बुधवारी झाली. गृह विभागाने याबाबतचे आदेश काढले. बीडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक आर. राजा यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर पोलिस अधीक्षकपद रिक्त होते. यानंतर पंकज देशमुख यांच्याकडे पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार दिला होता.

बुधवारी गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नांदेड येथील नागरी हक्क विभागाचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नियुक्ती झाली. ठाकूर यांनी यापूर्वी रत्नागिरी, जळगावसह मुंबई क्राईम ब्रँचमध्ये काम केले. मुंबईत हाय प्रोफाइल गुन्ह्यांचा त्यांनी तपास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...