आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोमोओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया या होमिओपॅथीच्या राष्ट्रीय संघटनेचे 22वे ऑल इंडिया होमिओपॅथीक सायंटिफिक सेमिनारचे 14 व 15 मे 2022 रोजी रुक्मिणी ऑडिटोरियम सिडको औरंगाबाद येथे आयोजित केल्याची माहिती या सेमिनारचे कोचेअरमन आमदार विक्रम काळे,ऑर्गनाईझींग कमिटीचे चेअरमन डॉ अरुण भस्मे ऑर्गनाईझींग सेक्रेटरी डॉ बाळासाहेब पवार व कोषाध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
या सेमिनारचे आयोजन होमिओपॅथी मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाची महाराष्ट्र शाखा,असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रायव्हेट होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजेस बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी अध्यक्ष तथा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पटना येथील डॉ रामजी सिंग असून बडोदा येथील डॉ पियुष जोशी हे सेक्रेटरी जनरल आहेत तर कोलकता येथील डॉ स ईलताफ हुसेन हे राष्ट्रीय डेप्युटी प्रेसिडेंट यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या सेमिनारचे चीफ पॅट्रॉन म्हणून वडोदरा येथील पारूल विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉ देवांशु पटेल यांनी स्वीकृती दिली आहे. या सेमिनारच्या स्वागत कमिटीचे चेअरमन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तर को चेअरमन मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र दर्डा,माजीआमदार सुभाष झाम्बड, माजी आमदार डॉ कल्याण काळे, माजी आमदार एम. एम. शेख, महात्मा गांधी मिशनचे कुलपती मा अंकुशराव कदम,उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांचे हे सेमिनार सफल करण्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.