आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडी. के. गुजर हे हाडामासाचे आणि आदर्श शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजीवन केलेला संघर्ष विसरणे अशक्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी यांनी केले. शनिवारी (७ मे) दुपारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात येथील कै. डी. के. गुजर सर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुजर समाजातील आजी-माजी भारतीय सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कै. डी. के. गुजर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप्रज्वलनाने झाली. या सोहळ्यात प्राचार्या क्षीरसागर व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन आजी-माजी भारतीय सैनिकांना सन्मानित करण्यात आले. डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रांत सरचिटणीस आणि प्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभाग प्रमुख कै. डी. के. गुजर यांचे शिक्षक संघटनेच्या माध्यमातून ३० वर्ष केलेले समाजकार्य अतुलनीय आणि कौतुकास्पद आहे. डी. के. गुजर हे खूप कमी काळ जगले तरी त्यांनी आपलं काम करता करता सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन समाजकार्यात स्वतःला त्यांनी वाहून घेतले होते. स्व. काकूंपासून त्यांचे संबंध आमच्या परिवाराशी घनिष्ट आणि जिव्हाळ्याचे होते. कै. डी. के. गुजर यांच्या जयंतीनिमित्त आज-माजी ४२ सैनिकांचा होत असलेला सन्मान कौतुकास्पद आहे, कारण सैनिकांचे महत्त्व आणि योगदान आपल्या देशासाठी किती आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे. खरं तर या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत, त्यांच्यामुळेच आपल्याला सुखाची झोप लागते, असे डॉ. क्षीरसागर म्हणाल्या.
आजी-माजी सैनिकांच्या पत्नींच्या संघर्षाचे करावे तेवढे कौतुकही
तसेच इथे उपस्थित असलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पत्नींच्या संघर्षाचे करावे तेवढे कौतुकही कमी आहे. महिलांना अबला म्हणून चालणार नाही कारण महिलांमध्ये संघर्ष करणाची जिद्द, चिकाटी आणि शक्ती प्रचंड असते. याप्रसंगी माजी आमदार उषा दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कुंडलिक खांडे, विनोद मुळूक, विलास विधाते, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे यांच्याबरोबर गुजर समाज बांधव मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.