आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:अंबाजोगाईत जयहिंद ग्रुपच्या‎ वतीने माजी विद्यार्थ्यांचा गौरव‎

अंबाजोगाई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ येथील एनसीसी विभागाच्या वतीने माजी‎ विद्यार्थी तथा विविध स्पर्धा, उपक्रमांत यश‎ मिळवून नावलौकिक करणाऱ्या ऋग्वेद‎ कुलकर्णी, ऋचा कुलकर्णी, ओंकार‎ रापतवार, सागर कुलकर्णी यांचा सत्कार‎ करण्यात आला.‎ याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश्वरी‎ शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माणिकराव‎ लोमटे, कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकरराव‎ चौसाळकर तसेच पंडित कराड,‎ व्ही.आर.चौधरी, माजी मुख्याध्यापक लंकेश‎ वैद्य, माजी मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे,‎ रामराव आडे, भागवत मसने, रवींद्र मठपती,‎ बी.के.मसने, दत्ता बनसोडे यांची उपस्थिती‎ होती.

ऋचा कुलकर्णी हिला राज्य नाट्यस्पर्धे‎ अंतर्गत ‘सेल्फी’या नाटकातील प्रमुख‎ भूमिकीकरिता महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार‎ मिळाला. ओंकार रापतवार याचे संगीत‎ आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले. सागर‎ कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच‎ कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल या‎ सर्वांचा एनसीसीच्या विभागाच्या वतीने‎ सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मेजर‎ एस.पी.कुलकर्णी यांनी माजी विद्यार्थी हे‎ विविध क्षेत्रात नाव कमवत असून ते‎ एनसीसीचे विद्यार्थी असल्याचा आम्हाला‎ सार्थ अभिमान आहे, असे सांगितले.‎ एनसीसीमधील शिस्त आणि कष्ट तसेच‎ अपार मेहनतीच्या बळावर या सर्व क्षेत्रात‎ किंवा कोणत्याही क्षेत्रात नाव कमवता येऊ‎ शकते, हे या विद्यार्थ्यांनी दर्शवून दिल्याची‎ माहिती दिली.‎

बातम्या आणखी आहेत...