आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिकांचा गौरव:कडा येथे गजानन मित्रमंडळाच्या वतीने माजी सैनिकांचा गौरव करून आरतीचा मान

कडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गजानन गणेश मित्र मंडळाच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. कडा येथील सरकारी दवाखाना रस्त्यावरील गजानननगर मध्ये गजानन गणेश मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली असून या गणेश मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत रविवारी संध्याकाळी मंडळाच्या वतीने आष्टी तालुक्यातील माजी सैनिकांची मिरवणूक काढण्यात आली. नंतर त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश खोटे, सचिव हनुमान झगडे व माजी सैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...