आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:अंबाजोगाई येथे मेडिकल प्रॅक्टिशनर्सचा सन्मान

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. वैष्णव बैरागी विकास फाउंडेशनच्या वतीने मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

येथील मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर झाली. मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.राहुल धाकडे तर उपाध्यक्षपदी डॉ.मनोज वैष्णव तरडॉ.विठ्ठल केंद्रे सचिवपदी निवड झाली. यासह डॉ.महेश ढेले (कोषाध्यक्ष), डॉ.शीतल सोनवणे (सहसचिव), डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.योगिनी नागरगोजे, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.मनीषा पवार, डॉ.इम्रान अली, डॉ.सुलभा पाटील, डॉ.विशाल भुसारे यांचीही कार्यकारिणीवर निवड झाली. वैष्णव बैरागी विकास फाउंडेशन अंबाजोगाच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष अभिमन्यू वैष्णव, दिपक वैष्णव, अमोल वैष्णव, प्रवीण वैष्णव, रोहित वैष्णव, गणेश वैष्णव, मंगेश वैष्णव, बालाजी वैष्णव यांनी सर्वांचा सन्मान केला.

बातम्या आणखी आहेत...