आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या सहभागाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात झाला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, सेवानिवृत्त कर्नल सोंडगे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संजय देशपांडे यासह सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी जवान त्यांचे कुटुंबीय तसेच जिल्ह्यातील शहीद जवानांचे वीरमाता, वीर पिता, वीर पत्नी, शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्य, सैनिकी विद्यालयाचे अध्यापक वर्ग, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस अमर जवान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांना पोलिस विभागाच्या मार्फत बिगुलची धून वाजवून व स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गतवर्षी बीड जिल्ह्याने ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दिष्ट १२२ टक्क्याने पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे विभागाच्या वतीने प्राप्त स्मृतीचिन्ह जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी स्वीकारला. तसेच ध्वज निधी संकलनामध्ये भरीव योगदान दिलेल्या शासकीय आस्थापनांच्या अधिकारी व उपस्थित प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग यांच्या विभागामार्फत १४ लाख ६० हजार व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या विभागामार्फत ३० लाख ७० हजार रुपये ध्वजदिन निधी गतवर्षी संकलित केला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिलींद शिवणीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सैन्य पदक प्राप्त सुभेदार मेघराज कोल्हे, सैनिक विद्यालयाचे प्राचार्य शाम डाके, े सैनिक कल्याण संघटक अंगद तांबे, तुकाराम काकडे, किसन काकडे, अर्चना शेंडगे यांची उपस्थिती होती.
वीरमाता, पत्नींचा सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित सीताबाई राख, उषा शिंदे, आशा खळदकर, रत्नमाला वाल्हेकर, अरुणा नागरगोजे, भाग्यश्री राख, प्रतिभा समुद्रे, सीताबाई गायकवाड या वीरमाता व वीरपत्नी यांचा यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित नसलेल्या वीरमाता, वीरपत्नी व शहीद कुटुंबीयांच्या प्रती सन्मान प्रदर्शित करताना आदर व्यक्त करण्यात आला.
उल्लेखनीय कामगिरीचाही गौरव सेवानिवृत्त सुभेदार मेघराज कोल्हे यांनी अतिरेक्यांशी लढून शौर्य गाजविल्याने त्यांना सेना मेडल प्राप्त झालेे, त्यांचा सपत्नीक सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अपंगत्व आलेले सुभेदार महादेव केरू मळेकर यांच्या पत्नी जयश्री मळेकर यांना शासनाचा ताम्रपट प्रदान करुन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त गोवर्धन गरजे यांची कन्या ऋतुजा सहभागी असलेल्या टीमने थायलंड येथे आयोजित एशियन क्रीडा स्पर्धेत ड्रॅगन बोट क्रीडा प्रकारात कास्य पदक मिळवून दिले आहे, यासाठी सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.