आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुणवंतांचा गौरव सोहळा ; आदर्श समाजाचा शिक्षक खरा पाया : साबळे

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या यशस्वी लोकांमागे शिक्षकांचे मोठे योगदान असते. सर्वगुणसंपन्न पिढी घडवण्याचे काम शिक्षक नेटाने करत असतात. आदर्श समाजाचा पाया घालण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे त्यांनी या क्षेत्राचे पावित्र्य राखावे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले.

येथील शक्ती प्रतिष्ठान आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ ११ सप्टेंबर रोजी जिल्हा स्काऊट गाईड सभागृहात मोठ्या थाटात पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, डॉ.विक्रम सारुक, माजी मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी, मंगल केंडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय केंडे यांची यावेळी उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले, शक्ती प्रतिष्ठानचे सामाजिक, शैक्षणिक चळवळीत नेहमीच योगदान राहिले आहे.प्रतिष्ठानच्या पुरस्कारांनी सन्मानित शिक्षकांना पुढे राज्य, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, यावरून प्रतिष्ठानची निवड किती अचूक आहे, याचा प्रत्यय येतो.

प्रास्ताविक संजय चौसाळकर यांनी केले. एल. बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले. आभार सुहास पालीमकर यांनी मानले. सूर्यकांत जोगदंड, लक्ष्मीकांत खडकीकर, कल्याण जावळे, गणेश स्वामी, केदारनाथ बहिरमल यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...