आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:दहिफळ येथे वडमाउली देवी यात्रेला उदंड प्रतिसाद

केज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील वडमाऊली देवीची यात्रा कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो भक्तांनी पालखी मिरवणुकीत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले.

वडमाऊली देवीवर भक्तांची श्रद्धा आहे. नवस पूर्ण झालेले भक्त हे वर्षातून एकदा का होईना देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात. तर यात्रेला भक्तांची हजारोंच्या संख्येने मांदियाळी असते. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे यात्रा भरली नव्हती. तर दर्शनासाठी ही जाता न आल्याने यंदा यात्रेला चार दिवसाच्या कालावधीत चार लाख भक्तांनी हजेरी लावली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष येडू ठोंबरे व सचिव भिकचंद ठोंबरे यांनी दिली. गावातून २७ एप्रिल रोजी देवीची पालखी निघाली.

गावातून ते चार किमी अंतरावर असलेल्या वडमाऊली देवीच्या मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढून पालखी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पालखी सोहळ्यात चार किमीचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलला होता. केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. १ मे रोजी रात्री देवीची छबीना मिरवणूक पार पडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...